तथागत भगवान गौतम बुध्दाने सांगीतलेला विज्ञानवादी दृष्टीकोन जगाला तारक ठरणारा - प्रा. बलखंडे
हिंगोली - विश्वशांतीदूत जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुध्दाचा अंधश्रध्दामुक्त, विज्ञानवादी दृष्टीकोनच या जगाला आज तारक ठरणारा आहे हे सर्वानी लक्षात घेतले पाहीजे असे प्रतिपादन वैभव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. बलखंडे यु.एच. यांनी तथागत भगवान गौतम बुध्द यांची जयंतीदिनी मार्गदर्शनपर मनोगतात सांगीतले.
वैभव शिक्षण प्रसारक मंडळ व भारतीय बौध्द महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वशांतीदूत जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुध्द यांची २५६५ वी जयंती राहुलनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलमध्ये कोरोनाचे नियम पाळून साजरी करण्यात आली. याप्रसंगी पंचशिल ध्वजारोहण समाजसेविका सविता दिपकराव इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष प्रा. बलखंडे यु.एच., सहशिक्षीका नंदाताई नागेश खिल्लारे, संस्थेच्या सचिव रत्नमाला फकीरराव पाईकराव, भारतीय बौध्द महासभेचे जिल्हा अध्यक्ष सुभाष भिसे, सुरेश कुर्हे, सिताराम नरवाडे, बौध्दाचार्य पाईकराव त्र्यंबकराव, गणेश बगाटे, नितीन धाबे, संदेश नरवाडे, रत्नमाला बगाटे, सविता इंगोले, उत्कृष इंगोले. कु. प्रेरणा बलखंडे इत्यादी उपासकांची उपस्थिती होती. सुत्रसंचालन सिताराम नरवाडे यांनी तर आभार गणेश बगाटे यांनी मानले. याप्रसंगी उपस्थित सर्वाना खिरदान देण्यात आले.