कोल्हापूर : आज खा. संभाजी राजेंनी आयोजित केलेल्या कोल्हापूर येथील मराठा मूक आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आद. प्रकाश आंबेडकर सहभागी झाले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे अस स्पष्ट केलं. राज्य व केंद्र सरकारने सर्व उपाय तपासून योग्य पाऊल उचलावं आणि मराठा समाजाला न्याय द्यावा असे आम्ही आवाहन करतो. असही ते यावेळी म्हणाले.
विविध समूहांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने १९५१ साली दिलेल्या दोराईराजन निकालाचा फेरविचार होणे गरजेचे आहे, हे पुन्हा याठिकाणी नमूद करतो. असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.
#मराठा_आरक्षण