रमा मातेने केलेल्या महान त्यागामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागतीक महान कायदेपंडीत झाले - श्रीमती पाईकराव
हिंगोली - रमा मातेने संसारात येणार्या अनेक अडचणींना धैर्याने तोंड देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हसतमुखाने साथ देत असतांना त्यांनी केलेल्या महान त्यागामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागतीक किर्तीचे महान कायदेपंडीत झाले असे प्रतिपादन संस्थेच्या सचिव श्रीमती रत्नमाला फकीरराव पाईकराव यांनी रमा मातेच्या स्मृतीदिन साजरा करत असतांना सांगीतले.
भारतीय बौध्द महासभा व वैभव शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने माता रमाई यांच्या ८६ वा स्मृतीदिन राहुलनगर मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलमध्ये साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सहशिक्षीका नंदाताई नागेश खिल्लारे ह्या होत्या तर प्रमुख मार्गदर्शक संस्थेच्या सचिव श्रीमती रत्नमाला पाईकराव, सविता दिपक इंगोले, प्रा. बलखंडे यु.एच. सिताराम नरवाडे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. सर्वप्रथम वरील मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार अपृण करुन सर्वानी अभिवादन केले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी रमा मातेने केलेल्या त्यागाविषयी सविस्तर माहिती सांगीतली. सुत्रसंचालन कु. प्रेरणा उत्तमराव बलखंडे हिने तर आभार निकिता धाबे हिने मानले.