लिंगायत धर्मसंस्थापक महात्मा बसवेश्वरांची विटंबना करुन देशभरातील लिंगायतांची व बसव अनुयायींची भावना दुखावणार्या शामनुर शिवशंकरप्पा, दावणगेरी, कर्नाटक या समाजकंटका विरोधात वंचित बहुजन आघाडी ही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तक्रार नोंदवणार असुन या संदर्भात त्या शामनुर वर गुन्हा दाखल करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते व सुप्रसिद्ध बसव कथाकार अँड.शिवानंद हैबतपुरे यानी आज आपल्या निवेदनात म्हटले आहे.
पुढे बोलताना हैबतपुरे म्हणाले की लिंगायत धर्मसंस्थापक महात्मा बसवण्णा हे देशभरातील तमाम जनतेचे व लिंगायत धर्मीयांचे श्रद्धास्थान आहेत. महात्मा बसवण्णांची शिकवण ही सामाजिक समता, स्वातंत्र्यता, विश्वबंधुत्व, आणि सामाजिक न्यायाची आहे. आज देशभरातच नव्हे तर संपूर्ण जगात बसव विचारांचे अनुयायी आढळून येतात. अशा विश्वमानव महात्मा बसवण्णांच्या जयंतीच्या दिवशी दि.26/4/2020 रोजी दावणगेरी कर्नाटक येथे एका बैलाला बसवण्णा संबोधून त्याला चारा खाऊ घालत त्याचा उपहास व अपमान करण्याचा मोठा गुन्हा शामनुर शिवशंकरप्पा या समाजकंटकाने केला आहे. या समाजकंटकाच्या कृत्याने देशभरातील समतावादी जनतेच्या व कोट्यवधी लिंगायत बांधवांच्या अस्मिता दुखावल्या आहेत.
देशात लाँकडाऊन ची परिस्थिती असतानाही शामनुर शिवशंकरप्पा यांनी केलेले हे कृत्य सामाजिक शांतता व कायदा व्यवस्था धोक्यात आणणारी आहे. हे कृत्य अतिशय गंभीर असुन यामुळे बहुजन समाज संतप्त झाला असून कोट्यावधी लोकांच्या धार्मिक व सामाजिक भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी केवळ शामनुर हा एकटाच दोषी नसुन त्याची अखिल भारतीय विरशैव महासभा देखील तेवढीच दोषी आहे.
सदर समाजकंटक शामनुर शिवशंकरप्पा आणि अखिल भारतीय वीरशैव महासभेवर जर गुन्हा दाखल होऊन योग्य ती कारवाई झाली नाही तर निर्माण होणाऱ्या कायदा सुव्यवस्थेच्या अडचणीला स्वतः प्रशासन जबाबदार असेल असा इशाराही अँड.शिवानंद हैबतपुरे यांनी दिला आहे.
***